Central HomeMinister Amit Shaha : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतले रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एनसीपीएमध्ये रतन टाटा यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहे. रतन टाटा यांचं पार्थिव अंतिमदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. त्यासाठी अमित शहा दिल्लीतून मुंबईला खास रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेले आहेत. यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.
टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह रुग्णालयातून त्यांच्या घरी नेण्यात आला. टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या सभागृहात ठेवण्यात आले आहे. यावेळी अनेक दिग्गज व्यक्तींनी, नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.