RSS On BJP News | अजित पवारांना सोबत का घेतलं? संघाच्या मुखपत्रातून भाजपला सवाल!

RSS On BJP News | अजित पवार यांच्याशी भाजपने युती केल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपवर नाराज

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झालेला प्रचार आणि एकंदर कामगिरीवरूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपावर नाराज असल्याचे चित्र आहे. “नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी मर्यादा पाळल्या नाहीत”, असा दावा करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला कानपिचक्या दिल्या आहेत. एकीकडे त्यांनी केलेली वक्तव्ये चर्चेत असतानाच दुसरीकडे ऑर्गनायझर या संघाच्या मुखपत्रामधूनही भाजपाला खडेबोल सुनावण्यात आले आहेत. या लेखातून अजित पवार यांना सोबत का घेतलं? असा प्रश्न भाजपला विचारण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com