VIDEO: Ranjit Nimbalkar गोळीबार प्रकरण, गौतम काकडेंना पोलिसांकडून अटक

Ranjit Nimbalkar Murder News: रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाला होता, रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर गौतम काकडे फरार होते.

बारामतीत झालेल्या गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. याप्रकरणी पोलीसांनी गौतम काकडेंना अटक केली आहे. सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारातून निंबाळकर आणि काकडे यांच्यात वाद झाला होता. रणजित निंबाळकर यांच्यावर झाल्याचा धक्कादयक प्रकार घडला होता. रणजित निंबाळकरांवर गोळीबार झाल्यानंतर गौतम काकडे फरार झाले होते. रविवारी रणजीत निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. यानंतर आज गौतम काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. गौतम काकडे यांना अटक करा यासाठी रणजित निंबाळकर यांच्या पत्नीने आत्मदहनाचा इशारा दिला होता. गौरव काकडे आणि शाहजी काकडे यांना पोलिसांकडून आधीच अटक करण्यात आली होती आणि आता गौतम काकडे यांना पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com