राणी विरुद्ध बुलेट! नंदुरबारमध्ये रंगली घोडा–बाईकची थरारक शर्यत; पाहा VIDEO

Sarangkheda Horse Vs Bullet Motorcycle Full Race Video: नंदुरबारच्या सारंगखेडा घोडेबाजारात घोडा आणि बुलेट मोटरसायकल यांच्यात झालेल्या थरारक शर्यतीत घोड्यांनी अविश्वसनीय वेग दाखवत बुलेटला मागे टाकलं.

नंदुरबार: सारंगखेडा घोडे बाजारात आज सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते घोडा आणि बुलेट मोटरसायकल यांच्यात झालेल्या थरारक शर्यतीने. अश्वशौकीनांची मोठी गर्दी या रोमांचक क्षणासाठी ट्रॅकवर जमली होती. घोड्याचा पारंपरिक वेग आणि बुलेटचा दमदार स्पीड दोघांमधील हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह होता. घोड्यांची आणि बुलेटची समांतर शर्यत रंगात आली आणि शेवटी परंपरेचा वेग जिंकला. घोड्यांनी बुलेटला मागे टाकत बाजी मारली.

घोडा हा वेगाचे प्रतीक मानला जातो आणि आजच्या या शर्यतीत त्याने पुन्हा एकदा आपली ताकद आणि चपळपणा सिद्ध केली.

या शर्यतीतील मुख्य आकर्षण ठरली मध्यप्रदेशच्या महेश्वर येथील यादव स्टड फार्मची वेगवान राणी ही घोडी. या घोडीनं बुलेट मोटरसायकलसोबत रेसिंग ट्रॅकवर झालेल्या स्पर्धेत अविश्वसनीय वेग दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. घोडे मालकांनीच आयोजकांकडे घोडा आणि बुलेट यांच्यात रेस घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर झालेल्या या अनोख्या स्पर्धेने घोडेबाजारची क्रेझ अधिकच वाढवली. प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या गजरात या अनोख्या क्षणांचा आनंद लुटला. सारंगखेडा घोडे बाजारात पारंपरिक रांग, रंग आणि वेगाला नव्या थराराची जोड देणारी ही शर्यत आजची खास आकर्षण ठरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com