Maharashtra Politics: राज उद्धव एकत्र यावे हीच श्रींची इच्छा, पुण्यात दोन्ही नेत्यांचे एकत्रित फ्लेक्स, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Raj and Uddhav Thackeray Unity Flex In Pune: पुण्यात गणेश विसर्जनाच्या निमित्ताने लागलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त फ्लेक्समुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

पुणे शहरात उद्या होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी शुभेच्छांचे फ्लेक्स लागले आहेत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे एकत्रित असलेल्या एक फ्लेक्स सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरतोय. शहरातील अलका टॉकीज चौकात लागलेला या फ्लेक्सवर दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. राज्याच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं हीच श्रींची इच्छा आहे असं साकडं सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या फ्लेक्स च्या माध्यमातून गणरायाकडे केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com