Raj Thackeray : हे राजकारणी नाही, जमिनीचे सौदागर; राज ठाकरेंची राज्यकर्त्यांवर जोरदार टीका
कोकणातील लोक मुंबई-पुण्याकडे का जात आहेत? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. आज गुहागरमध्ये आयोजित प्रचार सभेत त्यांनी राज्यकर्ते आणि राजकारण्यांवर जोरदार टीका केली.
यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कोकणात आलं की कोकण भूरळ घालतं. परदेशातील सौंदर्य पाहून इकड पाहिल्यावर खंत वाटते. चुकीची माणसं निवडून दिल्यानं दुर्भाग्य, त्यांनी स्वतः काही केलं नाही. उद्योग धंदे नसल्याने अनेक तरुण मुंबई पुण्याकडे जात आहेत. मुंबई पुण्याचे परदेशी निघून जातात. 750 किलोमीटर समुद्र किनारा महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. गोवा राज्य पर्यटनावर सुरू आहे, इतकं सुंदर कोकण करता येईल त्याची कल्पना करता येणार नाही. पायाखालची जमिन गेली की तुमचं अस्तित्व संपलं. इतिहास जमिनीशी, भूगोलाशी आधारीत आहे. 2006 साली पक्ष निर्मितीच्या वेळी जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा म्हटलं होतं. कोकणात चमत्कार घडवून दाखवतो आम्हाला निवडून द्या. तुमचा शत्रु जमिनीवरून जमिनी हडप करण्यासाठी येतोय. राजकारणी नाहीत. जमिनीतील दलाल आहेत. जमिनी घेण्यासाठी आपली माणसे तुमच्याकडे येतात. नाणार, बारसू प्रस्ताव आला पाच हजार एकर जमिन आली कुठून? असा सवालही यावेळी राज ठाकरेंनी उपस्थित केला. राजकारणी नाहीत हे जमिनीचे सौदागर आहेत असं म्हणत कोकणातील जमिनी विकू नका, असा सल्ला राज ठाकरेंनी कोकण वासियांना दिला आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.