VIDEO: गुन्हा दाखल करण्यासाठी 12 तास का लावले? Badlapur हिंसाचार प्रकरणी ट्विट करत Raj Thackeray यांचा सवाल
बदलापुरात चिमुरड्यांवर अत्याचार केल्या प्रकरणी आंदोलन करण्यात आलं. शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडून चिमुकल्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी संतप्त आंदोलकांकडून करण्यात येत होती. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा असून मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यात पोलिसांनी १२ तास का लावले ? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला आहे. एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, तसेच या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांतलक्ष असू द्या असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी महाराष्ट्रसैनिकांना केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.