Raj Thackeray Sabha: सभेआधी मोठी घडामोड! एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले, कारण काय?

Raj Thackeray Sabha News: महायुतीच्या सभेआधी शिवाजी पार्कातून मोठी अपडेट, शिंदेंसह फडणवीसही राज ठाकरेंच्या निवासस्थानी

महायुतीची मुंबईत सभा पार पडण्याआधी एक महत्त्वाची बातमी शिवाजी पार्कमधून समोर आली आहे. महायुतीच्या सभेआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी तिन्ही दिग्गज नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याचं पाहायला मिळाली. दरम्यान, राज ठाकरेंच्या निवासस्थानी असलेल्या गॅलरीतून तिन्ही नेत्यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर येणंही पसंत केलं. राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदे आणि फडणवीस यांची राज ठाकरेंशी महत्त्वाची चर्चा झाल्याचं यावेळी पाहायला मिळालंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com