राज आणि उद्धव ठाकरे हे दोघ एकत्र येणार अशी चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी एप्रिलच्या अखेर दिलेल्या महेश मांजरेकर यांना एका मुलाखतीत त्यातून अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना घातलेली साद आणि त्यावर अवघ्या काही तासातच उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रतिसाद.
यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार हे निश्चितच मानले जात आहे. दोन्ही पक्षाचे नेते सध्या यावर सकारात्मक बोलत असल्याने युतीची शक्यता देखील वाढली आहे. परंतु दुसरीकडे मनसेने प्लॅन बी देखील तयार केला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 2014 आणि 2017 मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपल्या सोबत विश्वासघात केला.
युतीची बोलणी करत आपल्याला झुलवत ठेवले अशी मनसेतील बऱ्याच नेत्यांची भावना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तसा प्रकार घडू नये यासाठी मनसेने सावध पवित्र घेतल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शिवसेना उबाठासोबत युतीचे शक्यता असताना राज ठाकरे यांच्या पक्षाला दुसरीकडे एक ला चलो रे ची तयारी सुरू केली आहे. प्लॅन ए सोबत प्लॅन बी वर मनसेने काम सुरू केले आहे. शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्याकडून एकमेकांच्या राजकीय ताकतीची चाचपणी सुरू आहे. मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक आज संपन्न झाली. पालिका निवडणुकीतील मुंबईतील ताकद आजमावण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. मनसेच्या केंद्र समितीने आपला अहवाल राज ठाकरे यांना दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.