Raj Thackeray: गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर राज ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता, VIDEO

MNS GudiPadwa: बीड प्रकरण, औरंगजेबाची कबर तसेच नागपूर दंगल यावर राज ठाकरे काय बोलता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मनसे स्वबळाचा नारा देईल की महायुतीसोबत जाणार हे देखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याला राज ठाकरे यांची तोफ शिवाजी पार्कवर धडाडणार आहे. 30 मार्चला यंदाचा गुढीपाडवा आहे. या गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सभेसाठी पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मनसेला यावेळी देखील मोठा पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांचा असलेला एकमेव आमदार राजू पाटील देखील यांचा देखील पराभव झाला होता. यानंतर कायदेशीर रित्या मनसे पक्ष हा रद्द होणार अशा देखील चर्चा रंगल्या होत्या. यानंतर भाजप आणि मनसे युती होणार अशाही राजकीय वर्तुळात चर्चा होत्या. या सर्व तर्कवितरकाला गुढीपाडव्याच्या दिवशी विरामचिन्ह लागण्याची शक्यता आहे. तसेच राज ठाकरे काय चाबूक फिरवता हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com