VIDEO : मोदींना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे, राहुल गांधींचा हल्लाबोल | Marathi News

Rahul Gandhi News : अमरावतीच्या धामणगाव येथे आयोजित प्रचारसभेत राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

मी म्हणतो भाजप संविधानावर हल्ला करत आहे, ते म्हणतात काँग्रेस संविधानावर हल्ला करत आहे. मी प्रत्येक भाषणात विशेषतः मागील वर्षभरापासून भाजपवर संविधानावर हल्ला करण्याची टीका करत आहे. आता मोदी हेच आरोप आमच्यावर करत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी भाजप केली आहे. आज अमरावतीच्या धामणगाव येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, जातनिहाय जनगणना, बेरोजगारी, शेतकरी समस्या, अर्थव्यवस्था, समाजातील वाढता जातीयवाद, धार्मिक ध्रुवीकरण आदी विविध मुद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्मृतीभ्रंशाचा आजार जडल्याचाही आरोप राहुल गांधींनी आपल्या भाषणातून केला आहे. मी कोऱ्या पानाचं संविधान घेऊन फिरतो असा आरोप माझ्यावर केला जातोय, मात्र आम्ही देशाच्या संविधानाचं आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचं रक्षण करत आहोत, असं म्हणत राहुल गांधी यांनी त्यांच्या कडील संविधान उघडून दाखवलं.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मी प्रत्येक भाषणात आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याचा दावा करत आहे. लोकसभेतही मी मोदींपुढे हे सांगितले. पण मोदी स्मृतीभ्रंशामुळे माझ्यावरच आरक्षणाला विरोध असल्याचा आरोप करत आहेत. मी मोदींपुढे जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. पण कदाचित मोदी आपल्या पुढल्या भाषणात माझा जातनिहाय जनगणनेला विरोध असल्याचा आरोप करतील. मी वर्षभरापासून यावर बोलत आहेत, पण माध्यमे ते दाखवत नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com