MVA News : मविआची पंचसूत्री, प्रत्येक घटकाला खुश करण्याचा प्रयत्न; काय आहेत घोषणा, पाहा Video

MVA Election Campaign News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांकडून जाहिरनामे प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली आहे. मविआने देखील काल आपल्या प्रचाराचा नारळ फोडत पंचसूत्रीची घोषणा केली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली आहे. राज्यात मविआचं सरकार आल्यावर प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांच विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचं यात म्हंटलं आहे. त्याचबरोबर लाडक्या बहीणीप्रमाणेच महाविकास आघाडीने आपल्या पंचसूत्रीत महालक्ष्मी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देण्यात येणार आहेत. यासोबतच युवक शेतकऱ्यांसाठी देखील घोषणा करण्यात आला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांच्या प्रचार सभा पार पडायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची सभा काल पार पडली. या सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्वच नेते उपस्थित होते. या सभेतून राहुल गांधी यांनी मविआच्या पंचसूत्री जाहीरनाम्याची घोषणा केली आहे. यातून प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांच विमा संरक्षण आणि मोफत औषधी देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये, महिलांना मोफत बस प्रवास, कृषीसमृद्धी अंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करण्यासाठी 50 हजार माफ करण्यात येणार असल्याचं मविआने म्हंटलं आहे. जातनिहाय जनगणनेची घोषणा देखील यात सांगण्यात आलं आहे. बेरोजगार तरूणांना महिन्याला 4 हजारांची मदत करणार असल्याचं या पंचसूत्रीमधून सांगण्यात आलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com