Pune Z Bridge: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! झेड ब्रिज महिनाभरासाठी राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Pune Z Bridge Closed For 1 Month: पुण्यातील झेड ब्रिज १ महिन्यासाठी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पुण्यातील प्रसिद्ध झेड ब्रिज वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पुलावरील विस्तार सांधे म्हणजेच एक्सपेंशन जॉइंट्स आणि बेअरिंग्ज बदलण्याचे कामासाठी रात्री ११ वाजता ते सकाळी ७ वाजेपर्यंतचा कालावधी निवडण्यात आला. पुणे शहरातील डेक्कन परिसराला पेठ भागाशी जोडणारा स्वर्गीय काकासाहेब गाडगिल पूल ज्याला 'झेड ब्रिज' म्हणून ओळखले जाते. हा पूल दुरुस्तीच्या कामासाठी एक महिना बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी या काळात पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील वाहतूकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या या पुलाच्या दुरुस्तीचे काम १० एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम ९ मेपर्यंत चालणार असून या कालावधीत रात्रीच्या वेळी पुलावर वाहतूक पूर्णपणे बंद राहील. शहराच्या दैनंदिन वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारा हा पूल दुरुस्तीसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com