पुणे: राज्यभरात मागच्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर दोन दिवसांपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. मात्र, मान्सूनच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यासह शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे नुकसान झाले असून, तोडणीही थांबली आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक घटली आहे.
दुसरीकडे ग्राहकांकडून भाज्यांना मागणी वाढली असल्याने बहुतांश प्रकारच्या भाज्यांच्या भावाने शंभरी ओलांडली आहे. भाज्यांच्या भावात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली.
गवार १२० ते १३०
शेवगा १०० ते १२०
मटार १२० ते १६०
दोडका १०० ते १२०
भेंडी १०० ते १२०
सिमला मिरची १०० ते १२०
*मेथीची जुडी ७० रुपयांना*
पावसाला सुरुवात झाली, की दरवर्षी पालेभाज्यांचे मोठे नुकसान होते. परिणामी आवक घटत असते. तशीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्यामुळेच पालेभाज्यांचे भाव वाढले आहे. किरकोळ बाजारात मेथीच्या जुडीची ६० ते ७० रुपयांना विक्री करण्यात आली आतापर्यंतचा हा उच्चांकी दर मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.