VIDEO : तिकीटासाठी काय पण! भानगिरेंच्या उमेदवारीसाठी पुण्यातील शिवसैनिकांची पायी मुंबई वारी

ShindeSena Pune News : हडपसर मतदारसंघाची जागा शिंदेसेनेचे प्रमोद भानगिरे यांना देण्यात यावी म्हणून शिवसैनिक पायी चालत मुंबईला वर्षा बंगल्याकडे निघाले आहेत.

प्रमोद नाना भानगिरे उमेदवारी मिळावी म्हणून पुण्यातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर पायी वारी काढली आहे. हडपसर मधून शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना उमेदवारी मिळावी याकरिता हडपसर भागातील शिवसैनिकांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पायी चालत निघाले आहेत. हडपसर मतदारसंघ शिवसेनेला सोडावा पुण्यात शिवसेनेचा एक तरी आमदार शिवसेनेचा असावा ही तमाम शिवसैनिकांची मागणी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने यावेळी करण्यात येणार आहे.

हडपसर मतदारसंघ सध्या युतीकडे असून चेतन तुपे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. मात्र ही जागा नाना भानगिरे यांना मिळावी म्हणून शिवसैनिकांनी आज पुण्यातील हडपसर भागात असलेल्या प्रभू रामाच्या मंदिरात जाऊन आरती केली. त्याचबरोबर हे शिवसैनिकांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी पायी चालत निघाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन हे शिवसैनिक आपली मागणी मांडणार आहेत. त्यामुळे आता विद्यमान आमदार तुपे यांना डावलून शिवसेना एकनाथ शिंदे जागा मिळवणार का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com