पुणे-सातारा बंधाऱ्यावर कार कोसळली, पाहा थरारक व्हिडिओ

Car Falls Into Bundh On Pune-Satara Road: पुणे-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या बंधाऱ्यावर कार कोसळल्याची घटना घडली. स्थानिक मच्छीमारांनी चालकाला वाचवलं.

पुणे आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या एका बंधाऱ्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक चारचाकी थेट बंधाऱ्यात कोसळली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेदरम्यान परिसरातील स्थानिक मच्छीमारांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदत कार्य सुरू केले आणि गाडीतील चालकाचा जीव वाचवण्यात यश मिळवले. त्यांच्या या धाडसी आणि वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या बंधाऱ्याला दोन्ही बाजूंनी सुरक्षेसाठी आवश्यक असलेले कठडे नसल्याने अपघाताची शक्यता सातत्याने निर्माण होत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही अद्याप कठडे बसवले गेलेले नाहीत. त्यामुळे या अपघातानंतर बंधाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी तात्काळ सुरक्षाव्यवस्था उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com