Pune Porsche Accident | पुणे पोलिसांचा रिमांड रिपोर्ट 'साम'च्या हाती, पाहा व्हिडिओ

Pune Accident News Update : पुण्यातील कार अपघाताबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांचा रिमांड रिपोर्ट 'साम टीव्ही'च्या हाती लागला आहे.

पुण्यातील कार अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातील अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळाकडून जामीन देण्यात आला होता. यावरून सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त करण्यात आला होता. तसंच राजकीय वर्तुळातही याचे तीव्र पडसाद उमटले होते. पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र, योग्य ती कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. आता याच प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांचा रिमांड रिपोर्ट साम टीव्हीच्या हाती लागला आहे. अग्रवाल कुटुंबाच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे गरजेचे असल्याचे पुणे पोलिसांचे मत आहे. सीसीटीव्हीमध्ये काही छेडछाड करण्यात आली आहे का, हे तपासण्यात येणार आहे, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com