Pune Drug Party Video : पुण्यात चाललंय काय? पबमधील खळबळजनक व्हिडिओ आला समोर

Pune Drug Party Video News : पुणे पब पार्टी प्रकरणातील खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुणी ड्रग्जचं सेवन करत असल्याचं दिसत आहे. या वृत्तानंतर नागरिकांकडून कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

पुणे : पुणे पब पार्टी प्रकरणातील आणखी एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. पुण्यातील एल३ पबमधील तरुण-तरुणींच्या पार्टीमधील ड्रग्ज घेतानाचा तरुणीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणी टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेत असल्याचे दिसत आहे.

पुणे-नगरमधील नामांकित मॉलमधील पबमधील हा व्हिडिओ आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पार्टीमधील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे. या व्हिडिओमध्ये व्हिडिओ काढणारी तरुणी ड्रग्ज घ्यायचा फॉर्म्युला सांगताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com