Sharad Pawar Health Updates : शरद पवार यांची प्रकृती कशी? कधी मिळणार डिस्चार्ज? मोठी अपडेट समोर

Sharad Pawar latest news : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली असून आज सकाळी त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळणार आहे.

Sharad Pawar health update today : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. मागील पाच दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic news) उपचार घेत असलेल्या शरद पवार यांच्या प्रकृतीत मोठी सुधारणार झाली आहे. त्यांना आज सकाळी ११ वाजता डिस्चार्ज मिळणार आहे.

खोकल्याचा त्रास आणि इतर काही त्रासांमुळे शरद पवार यांना पाच दिवसांपूर्वी पुण्यातील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रूबी हॉल क्लिनिक रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांच्या प्रकृतीत आता मोठी सुधारणा झाली आहे. त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. पाच दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com