Pune Khadakwasla Dam: खडकवासल्यातून पाण्याच्या विसर्गाला सुरुवात, पुणे पुन्हा धोक्यात

Pune Khadakwasla Dam: खडकवासला धरणातून पाण्या विसर्ग करण्यात आलाय. यामुळे पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी शिरलंय.

पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर पुणे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी शिरलंय. दरम्यान एडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहचले असून पाण्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे काम सुरू आहे. एनडीआरएफीच्या पथकाने एका आजीचं रेस्क्यू करण्यात आले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर पुराच्या पाण्याचा फटका एकता नगरमधील रहिवाशांना बसलाय. अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्यात येत आहे. खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे सिंहगड रोडवर असलेल्या अनेक भागांमध्ये पाणी साचलंय.दुपारनंतर पाण्याची पातळी कमी झाली होती.पण आता पुन्हा पाणी पातळीत वाढ होऊ लागलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील एकता नगर येथे जात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी तेथील स्थानिक नागरिकांसोबत बातचीत केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com