Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट; काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबई : मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक प्रकरणी जरांगे पाटील यांच्या विरोधात हे अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
नाट्यनिर्मात्याची फसवणूक केलेल्या प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटकेचे वॉरंट काढले आहेत. नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते. मात्र, ते आंदोलनामुळे न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.