पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणेफाटा येथे कंटेनर आणि ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत. तर ट्रॅव्हल बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. लग्न समारंभासाठी निघालेली ट्रॅव्हल बस धामणेफाटा परिसरातून जात असताना समोरील कंटेनर अचानक थांबल्याने बसची मागून जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात बसमधील दहा ते बारा प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघाताचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.