VIDEO : वंचित आघाडी नक्की कोणसोबत? प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य | Marathi News

Prakash Ambedkar News : विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आज प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडी कोणाला पाठिंबा देणार यावर भाष्य केलं.

राज्यात विधानसभा निवडणुक निकालानंतर सत्तेसोबत जाणार असल्याचे मोठे संकेत प्रकाश आंबेडकरांनी दिले आहे. अकोल्यात माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यातील विधानसभा त्रिशंकू राहणार असल्याचा अंदाजही यावेळी त्यांनी केला आहे. राज्यातील सध्याचे राजकारण तत्वहीन आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणीही कुठेही जाऊ शकतं. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला सत्तेसोबत जाणं महत्त्वाचं वाटतं, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलं आहे. या वक्तव्यातून प्रकाश आंबेडकरांचे निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचं स्पष्ट संकेतच दिले आहेत.

दरम्यान, 'बटेंगे तो कटेंगे' च्या मुद्द्यावरही आंबेडकरांनी भाजपवर प्रहार केला. विकासाचे मुद्देच नसल्यामुळे भाजप मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप, यावर भाष्य करताना त्यांनी केला. त्याचबरोबर माध्यमं जाणीवपूर्वक वंचितकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com