Nashik News: नाशिकचे खड्डे म्हणजेच भ्रष्टाचाराचे अड्डे; मनसेचं महापालिकेसमोर आक्रमक आंदोलन|VIDEO

Massive Agitation in Nashik: नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर मनसेने आंदोलन केले. शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि विस्कळीत पाणीपुरवठा याच्या विरोधात मनसे आक्रमक पवित्र्यात उतरली होती.

अभिजीत सोनवणे, नाशिक

सिहस्थ नगरी म्हणून ओळख असणाऱ्या नाशिकमध्ये सध्या रस्त्यांत खड्डे आहेत की, खड्ड्यात रस्ते, अशी सध्या परिस्थिति आहे. पुढील वर्षी नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. यासाठी सरकारकडून मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडला जातोय. मात्र, प्रत्यक्षात प्रशासनाचा ढिसाळ कारभार सुरू आहे. दरवर्षी कोट्ट्यावधी रुपये खर्च करून रस्त्यांचे कामे केली जातात. पण पहिल्या पावसात रस्त्याची अक्षरशः चाळन होते.

यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच शहरातील पाणीपुरवठा देखील विस्कळीत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या वर्षी नाशिकमधील सर्वच धरणे हे 75 टक्के भरली असून देखील पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. या सर्व समस्येचा निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी नाशिक महापालिकेसमोर आंदोलन केले. 'भ्रष्टाचारांचे अड्डे नाशिकचे खड्डे' अशी घोषणा देत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी रिकामे हंडे घेऊन महिलादेखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com