टांगा पलटी, घोडे बेपत्ता...भाजप-शिंदेसेना वाद टोकाला, VIDEO

BJP vs Shinde Sena : नवी मुंबई महापालिका निवडणूक निकालानंतरही भाजप विरुद्ध शिंदेसेना वाद सुरूच आहे. गणेश नाईकांनी आता पुन्हा एकनाथ शिंदेंना नाव न घेता थेट लक्ष्य केलं आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेसेना विरुद्ध भाजप अशी लढत झाली. त्यात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात टीकेला टीकेनं उत्तर, आरोपांना प्रत्यारोपांनी उत्तर, तर आव्हानाला प्रतिआव्हान देण्यात आलं. नवी मुंबईत भाजपला घवघवीत यश मिळालं. या ठिकाणी गणेश नाईक किंगमेकर ठरले. निवडणूक निकालानंतर हा वाद संपणार असं वाटत असतानाच, तो आणखी टोकाला गेला आहे.

नवी मुंबई महापालिकेत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. निवडणूक निकालानंतर राजकीय टोलेबाजी करणारे बॅनर आता झळकू लागले आहेत. निवडणूक प्रचारात 'टांगा पलटी, घोडे फरार' या वाकप्रचाराचा वापर झाला होता. निवडणुकीत हा ट्रेलर होता, तर आता निवडणूक निकालानंतर खरा पिक्चर सुरू झाला आहे. निवडणुकीत शिंदेसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला वाद निकालानंतर कमी होण्याऐवजी तो अधिक टोकाला गेल्याचं दिसतंय. बॅनरवर गणेश नाईक यांचा फोटो असून, त्यावर टांगा पलटी, घोडे बेपत्ता असा मजकूर छापण्यात आलाय. यातून शिंदेसेनेला लक्ष्य केल्याचं दिसतंय.

मान-सन्मान दुसऱ्यांचा ठेवा, तरच जीवनात मजा असते. एका बाजूने काही होत नाही. कुणी नेहमी शिखरावर राहता येत नाही. आपण इतिहास बघितला आहे. ज्यानं अहंकाराची भाषा केली, त्याला पदच्युत व्हावं लागलंय, असं गणेश नाईक म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com