Madhukar Pichad Died : राजकीय वर्तुळात शोककळा! भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन

Madhukar Pichad Died Due To Brain Stroke : माजी आदिवासी विकास मंत्री ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं आज निधन झालं आहे. नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 2 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचं शुक्रवारी सायंकाळी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे. 15 ऑक्टोबरला त्यांना राजूर येथील राहात्या घरी ब्रेनस्ट्रोकचा झटका बसला होता. त्यानंतर त्यांना नाशिकच्या 9 पल्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 2 महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची तब्बेत अस्वस्थ असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली होती. मात्र संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

मधुकर पिचड यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य म्हणून झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पहिलं. शरद पवार यांच्या अत्यंत जवळचा नेता अशी त्यांची ओळख होती. तसंच राज्याच्या राजकारणातला एक महत्वाचा चेहेरा म्हणून देखील त्यांच्याकडे पहिलं जात होतं. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये माजी कॅबिनेट मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं होतं. पुढे 2019 मध्ये त्यांनी मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या पिचड परिवार भाजपमध्ये होते.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com