School Principal Beaten Up : महिला मदतनीस आणि शिक्षिकेची छेड काढली; थेट शाळेतच केली मुख्याधापकाची धुलाई, VIDEO

School Principal Beaten Up kolhapur : महिला मदतनीस आणि शिक्षिकेची छेड काढल्याचा आरोपावरून नागरिकांनी शिक्षिकेला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोची येथे मुख्याध्यापकाला नागरिकांनी शाळेत चोपल्याचा प्रकार घडला आहे. महिला मदतनीस आणि शिक्षिकेची छेड काढल्या प्रकरणी नागरिकांनी शाळेत जाऊन मुख्याधापकाची धुलाई केली आहे. कोल्हापुरातील कोरोची येथील जिल्हा परिषद शाळेतील ही घटना आहे.

महिला मदतनीस आणि शिक्षिकेची छेड काढल्याप्रकरणी नागरिकांनी मुख्याध्यापकाला जाब विचारला. त्यानंतर नागरिकांनी थेट शाळेतच मुख्याधापकाची धुलाई केल्याचा प्रकास समोर आला आहे. या मुख्याधापकाची धुलाई केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर नेटकऱ्यांकडून मुख्याधापकावर कारवाईची मागणी केली जात आहे. या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com