Beed Flood: बीडमध्ये महापूर!, 70 पेक्षा जास्त गावकऱ्यांचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू, पाहा व्हिडिओ

Helicopter Rescue Operation In Beed Floods: बीड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीत आष्टी तालुक्यातील कडा आणि शेरीखुर्द येथून 70 पेक्षा अधिक गावकऱ्यांना एनडीआरएफच्या मदतीने हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
Summary

बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण

आष्टी तालुक्यातील कडा आणि शेरीखुर्द गावातील नागरिक अडकले

एनडीआरएफच्या पथकाने हेलिकॉप्टरद्वारे 70 पेक्षा अधिक लोकांना वाचवले

प्रशासनाने तातडीने बचाव कार्य करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पाऊस सुरू असून मोठ्या प्रमाणात पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आष्टी तालुक्यातील कडा येथे अनेक जन हे नदीपात्राशेजारी अडकले होते. तसेच शेरीखुर्द येथील काहीजण पुरामध्ये अडकले होते. या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली. नाशिक येथून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आणि या लोकांना सुरक्षित जागी हलवण्यासाठी हेलिकॉप्टर मागवण्यात आले. या हेलिकॉप्टरद्वारे 70 पेक्षा अधिक लोकांना रेस्क्यू करण्यात आले.मागच्या काही दिवसांपासून पडणाऱ्या या पावसामुळे बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पुरस्थिति निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com