Nashik Crime News : मुलींच्या टोळीने सहा महिन्यांत तब्बल ३० ट्रक चालकांना लुटले, नाशिक महामार्गावर धक्कादायक घटना

Nashik News : नाशिकमध्ये दोन मुलींनी मुलांचा वेष घेऊन ट्रकचालकाला लुटल्याची धक्कादायक घटना. पोलिस चौकशीत सहा महिन्यांत ३० हून अधिक ट्रकचालकांना लुटल्याची कबुली. महामार्गावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
Nashik Crime News : मुलींच्या टोळीने सहा महिन्यांत तब्बल ३० ट्रक चालकांना लुटले, नाशिक महामार्गावर धक्कादायक घटना
Nashik NewsSaam Tv
Published On
Summary
  • नाशिकमध्ये दोन मुलींनी मुलांचा वेश घेऊन ट्रकचालकाला लुटले.

  • पोलिसांनी तात्काळ कारवाई करून दोन्ही आरोपींना अटक केली, तीन साथीदार फरार.

  • चौकशीत आरोपींनी सहा महिन्यांत ३० ट्रकचालकांना लुटल्याचे उघड.

  • महामार्गावरील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह, वाहनचालकांना सतर्क राहण्याचे आवाहन.

तरुणांच्या टोळीने लूटमार केली, तरुणांनी वेश बदलून पैसे हडपले या प्रकारच्या घटना आपण ऐकत आलो आहोत. मात्र नाशिकमध्ये चक्क मुलींनी मुलांसारखा वेश धारण करून लूटमार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे केवळ ट्रकचालकांचाच नव्हे, तर महामार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तरुणींनी केस कापून मुलांसारखा पेहराव केला होता. त्यांनी महामार्गावर एका ट्रकचालकाला थांबवून त्याला मारहाण केली आणि त्याच्याकडील ८ हजार रुपयांची रोकड लुटून नेली. पीडित ट्रकचालक रामनिवास वर्मा यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचून या दोन्ही तरुणींना अटक केली. मात्र त्यांचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेत फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.

Nashik Crime News : मुलींच्या टोळीने सहा महिन्यांत तब्बल ३० ट्रक चालकांना लुटले, नाशिक महामार्गावर धक्कादायक घटना
Nashik Tourism: हिरवागार निसर्ग आणि थंडगार वारा! नाशिकवरुन फक्त २५ किलोमीटरवर असलेल्या 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या

पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणींनी गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३० ट्रकचालकांना लुटल्याची कबुली दिली आहे. यावरून या टोळीने महामार्गावर किती मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी साखळी उभी केली होती, याचा अंदाज येतो. ट्रकचालकांना लक्ष्य करण्याचे कारण म्हणजे ते बहुधा रात्री प्रवास करतात, मोठ्या रकमा हातात असतात आणि एकटे असतात. या दुर्बलतेचा फायदा घेत या टोळीने लूटमार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Nashik Crime News : मुलींच्या टोळीने सहा महिन्यांत तब्बल ३० ट्रक चालकांना लुटले, नाशिक महामार्गावर धक्कादायक घटना
Nashik Tourism : त्र्यंबकेश्वरजवळ वसलंय निसर्गरम्य ठिकाण, एकदा गेलात तर परत यावं वाटणार नाही

दरम्यान फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत. महामार्गावरील टोलनाक्यांवर आणि महत्त्वाच्या चौकांत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ट्रकचालक व अन्य वाहनचालकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना किंवा वाहन थांबवताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत महामार्गावर लूटमार आणि दरोड्यांच्या घटना वाढल्या असून, गुन्हेगारांनी नवे-नवे डावपेच वापरायला सुरुवात केल्याचे दिसून येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com