VIDEO : Pooja Khedkar हिच्या दोन्ही बंगल्यांवर नोटीस! केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून फायनल नोटीस
वादग्रस्त माजी प्रोबेशनरी आयएएस (IAS) अधिकारी पूजा खेडकर हिच्या संदर्भातील मोठी बातमी आता समोर येत आहे. पूजा खेडकरला आता केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून फायनल नोटीस बजावण्यात आली आहे.
पूजा खेडकरने केंद्रीय लोकसभा आयोगाच्या तब्बल 12 वेळा परिक्षा देऊन, फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने स्पष्टीकरण मागितलं होतं दरम्यान आपलं म्हणणं सादर करण्यासाठी १६ ऑगस्टची अंतिम मुदत देखील देण्यात आली होती.परंतू नोटीसला कोणताही प्रतिसाद न आल्याने तिला यापुढे कोणतही स्पष्टीकरण देता येणार नाही, तसेच फायनल नोटीस बजावत तिच्या दोन्ही बंगल्यांवर नोटीस सुद्धा लावण्यात आली आहे. पूजा खेडकरवर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र, नावात फेरबदल केल्याचं सुद्धा उघड झालं असून तिच्यावर कारवाई सुरू आहे. दरम्यान पूजा ही परदेशात पळून गेल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.