

नवरात्रीत मुस्लिमांना बंदी घालणाची मागणी करणाऱ्या नितेश राणे यांनी आता आणखी एक खळबळजनक विधान केलंय. अब्दुलचा, आशिष व्हायची तयारी असेल तरच गरब्यात नाचायला या. म्हणजे हिंदू धर्म स्वीकारा असा थेट इशाराच राणे यांनी दिलाय. साम टीव्हीच्या विशेष मुलाखतीत नितेश राणेंनी हे विधान केलंय. सध्या गणेशोत्सव चालू असून प्रत्येकांच्या घरी गणरायाचे आगमन झालंय. राज्यातील जनतेला मत्स व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना राणेंनी गरब्यावरून पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. धर्माच्या हिंदू धर्माच्या अनुसार एक वेगळा महत्त्व असलेला तो सण आहे आणि म्हणून आमच्या सणांमध्ये जे हिंदू धर्माला मानणारे आहेत, जे सनातन हिंदू धर्माला मानणारे आहेत. जे मूर्ती पूजा करणारे आहेत. त्याच लोकांना गरब्यात येण्याची परवानगी आहे. आम्ही ईद आणि मोहर्रममध्ये आम्ही शामील होऊ शकतो का? आम्हाला तर ते काफिर मानतात, आम्ही कुठल्याही रमजानच्या वेळी जे काही त्यांचे रोजा सोडण्याच्या हिंदूंना बाजूला बसवतात का? मग ते इस्लाममध्ये अगर अशा काही तरतुदी नाहीयेत तर सनातन हिंदू धर्मामध्ये पण नाहीये म्हणून प्रत्येकाने आपल्या धार्मिक सगळे जे सणासुदी आहेत ते नियमानुसार चालवावेत त्याच्यामध्ये कोणी दुसऱ्यानी व्यत्यय आणू नये. जसे हिंदू आणत नाहीत म्हणून मुसलमानांनी पण आणू नये अस स्पष्ट भूमिका असल्याचं नितेश राणे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.