VIDEO : महायुतीकडून नितेश राणेंच्या 'त्या' वक्तव्याचा समाचार

Nitesh Rane Statement News : कणकवली येथील भाजपचे विधानसभा उमेदवार नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर महायुतीत खळबळ निर्माण झाली असून महायुतीकडून राणेंना घरचा आहेर देण्यात आला आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र व कणकवली येथील भाजपचे विधानसभा उमेदवार नितेश राणे यांनी राज्यात आमचं हिंदूंचं सरकार 23 तारखेला येणार आहे. त्यानंतर मशिदीवरील भोंगे काढले जातील असं वादग्रस्त विधान केल्यानंतर महायुती अंतर्गत खळबळ निर्माण झाली आहे. राणे यांच्या या वक्तव्याचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व शिंदेच्या शिवसेनेचे मुख्यप्रतोद भरत गोगावले यांनी चांगलाच समाचार घेतला. नितेश राणे यांना महायुतीचे सरकार काय करणार आहे हे बोलायचा अधिकार नाही, त्यांच्या वक्तव्या जवळ आमचा काही संबंध नाही. सरकार हे धर्म निरपेक्ष विचारांनीच काम करणार, असेसं मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केलंय. तर चार वर्षांत सत्तेत असताना का जमलं नाही राणेंना? असा सवाल उपस्थित करत राणेंच्या वक्तव्याला गांभीर्याने घेऊ नका असं आवाहन भरत गोगावले यांनी केलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com