Video: नेपाळ अपघात, मंत्री Raksha Khadse यांनी घेतली पिडीतांची भेट

जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील 80 नागरिक हे नेपाळ येथे पर्यटनासाठी गेलेले होते. त्यापैकी 40 नागरिकांची बस काठमांडू येथे शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता दरीत कोसळली.

जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील 80 नागरिक हे नेपाळ येथे पर्यटनासाठी गेलेले होते. त्यापैकी 40 नागरिकांची बस काठमांडू येथे शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता दरीत कोसळली. या भीषण अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली. नेपाळ बस दुर्घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे काठमांडूला पोहोचल्यात. रक्षा खडसे यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतलाय. भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव आणि नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव श्री ब्रिघू ढुंगाना यांच्यासोबत केली चर्चा. मृतदेह महाराष्ट्रात आणण्याबाबत चर्चा केलीये. लवकरच सर्व मृतदेह विशेष विमानाने महाराष्ट्रात आणले जाणार असल्याची माहिती मिळतीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com