Rohit Pawar : ‘हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’, 5 कोटींवर आमदार रोहित पवारांचा सरकारला इशारा

Rohit Pawar Statement On 5 Corer Seized Case : शिवापूरच्या चेक पोस्टच्या तपासणीत एका गाडीतून पाच कोटी रुपये मिळाल्याचं समोर आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता राज्यात लागू झाली असतानाच पुण्याजवळील खेडशिवापूर टोल नाका येथील निवडणूक आयोगाच्या चेक पोस्टच्या तपासणीत एका गाडीतून पाच कोटी रुपये मिळाल्याचं समोर आल आहे. ही गाडी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या कार्यकर्त्याची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील या घटनेवर प्रश्न विचारत आणखी चार गाड्या कुठे गेल्या असा सवाल उपस्थित केला आहे.

शिवापूर टोलनाका येथील चेक पोस्टमध्ये अशा प्रकारचे पैसे आढळून आल्यानंतर राज्य सरकारवर सडकून टीका करत शिवसेना शिंदे गटाच्या आमदारावर गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. 'हे पैसे शहाजी बापू पाटील यांचे असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेला मतदारसंघात १०० कोटी वाटले, आता विधानसभेला ५० कोटी वाटतील असं वाटतंय. जो मलिदा त्यांना मिळालाय तो ते वाटत आहे. मुंबईकडून हा पैसा जात होता, पण महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता त्याला बधणार नाही, कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं!' असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com