Maharashtra Politics : 'मोदी सरकार, शेतकरी विरोधी सरकार'; शरद पवार कडाडले, पाहा VIDEO
मुंबई : धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथे शरद पवारांनी शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली होती. सभेमध्ये बोलताना शरद पवार यांनी मोदी सरकार शेतकरी विरोधी सरकार असल्याची टीका केलीय. अलीकडंच्या काळात राज्यकर्त्यांना शेतीशी आस्था नाही. कांदा पीकाला भावा द्यायचा असेल तर निर्यात केली पाहिजे, मोदी सरकारने कांदा निर्यात बंद केली. देशात ऊस उत्पादन राज्यात होते. पण ऊसाला किंमत मिळत नाही, अशी टीका त्यांनी केलीय.
हा बळीराजाचा देश आहे. सिंदखेडा तालुक्यात सत्तेचा गैरवापर सुरु आहे. येथे एक प्रकारची गुंडगिरी सुरु आहे. हेमंत देशमुखांसारखा नेता तुरुंगात टाकण्याचे कामं केलंय. हा सत्तेचा गैरवापर असल्याची टीका पवारांनी केलीय. सरकार लोकांच्या सेवेसाठी आहे, सत्तेचा माज काहींच्या डोक्यात आला आहे. सत्तेचा उन्माद आहे, त्यांना जागा दाखविण्याचे कामं या निवडणुकीत करायचं आहे, असं आवाहन शरद पवार यांनी जनतेला केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.