बीडमधील पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्र काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया केला. यावरून राजकारण तापलं असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयात घुसले. जोपर्यंत हर्षवर्धन सपकाळ यांची भेट होत नाही, ते उत्तर देत नाहीत तोपर्यंत आम्ही जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, अशी मागणी महिला कार्यकर्त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसने केलेल्या टीकेवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? असंसदीय शब्द आहे का? हे एक वर्णन आहे. उपमुख्यमंत्री एकही शब्द बोलत नाहीत. म्हणून काँग्रेसने त्यांना हा शब्द वापरला आहे. आमच्या या टीकेला त्यांनी समजून घ्यावं. टीका होते त्यावेळी सकारात्मक पद्धतीने त्याकडे बघितले पाहिजे. इंदिरा गांधींनाही असाच शब्द वापरला गेला होता. पण त्यांनी कर्तृत्वाने सिद्ध केले आणि शेवटी अटलबिहारी वाजपेयींना त्यांना दुर्गा म्हणावे लागले. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनीही या काँग्रेसच्या टीकेला सकारात्मक घेऊन दुर्गा असल्याचे सिद्ध करावे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.