VIDEO : 'ती माझी मोठी चूक होती..', अजित पवारांनी कबूल केली चूक

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शक्तीप्रदर्शन करत बारामतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी लोकसभेतील चूक कबूल केली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नीला लोकसभेला उभं करणं ही माझी चूक होती, असं अजित पवार यांनी म्हंटलं आहे. बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी हे मोठं विधान केलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा अखेरचा दिवस असल्याने आज देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी सर्वच जिल्ह्यामध्ये गर्दी केल्याचं दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे तसेच युगेंद्र पवार, नितेश राणे हे देखील आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, बारामतीत आज अजित पवार यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. टवेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. बारामतीत त्यांच्या विरोधात पुतण्या युगेंद्र पवार हे शरद पवार गटातून उभे आहेत. याबद्दल बोलताना त्यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे विरोधात आपण आपल्या पत्नीला उभं केलं ही आपली सगळ्यात मोठी चूक असल्याचं त्यांनी म्हंटलं. मात्र तीच चूक विधानसभेत शरद पवार यांनी करायला नको होती. आता जनताच निर्णय देईल असंही त्यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com