Navneet Rana News: राणा दाम्पत्य दिल्लीला रवाना होणार,पराभवानंतर पहिल्यांदाच घराबाहेर

नवनीत राणा आणि रवी राणा दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. भाजपच्या बैठकीला राणा दाम्पत्य हजेरी लावणार आहेत.

अमरावती : अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातून भाजप उमेदवार (BJP Candidate) नवनीत राणा (Navneet Rana) यांचा पराभव झाला. आता नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) दिल्लीला रवाना झाले आहेत. अमरावतीत पराभव झाल्यानंतर राणा दाम्पत्य पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर चालले आहेत. दिल्लीत भाजपची बैठक (BJP Meeting) पार पडणार आहे. त्यानिमित्ताने राणा दाम्पत्य नागपूर विमानतळाहून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. अमरावतीमधून काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांचा १९ हजार ७३१ मतांनी विजय झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com