Thane Traffic: घणसोलीच्या उड्डाणपुलावर कंटेनर पलटला, प्रचंड वाहतूक कोंडी

Navi Mumbai News Today: ठाण्याच्या दिशेने जाताना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं प्रवाशांना खोळंबा झालाय.

नवी मुंबई : ठाणे बेलापूर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. घणसोली स्टेशन समोरील उड्डाणपुलावर कंटेनर पलटल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ठाण्याच्या दिशेने जाताना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं प्रवाशांना खोळंबा झालाय. स्थानिक वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल असून वाहतूक नियंत्रण करण्याचे काम सुरु करण्यात आलंय. दरम्यान, कंटेनरला बाजूला काढण्यासाठी जेसीबीची घेतली गेली असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com