Navi Mumbai : नवी मुंबईतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; ४५,००० रुपये बोनस मिळणार, पगारातही मोठी वाढ

Navi Mumbai Contractual Employees Diwali Bonus : नवी मुंबईतील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगारात सरसकट ५ हजार ५०० रुपयांची वाढ आणि दिवाळीनिमित्त ४५ हजार रुपयांचा बोनस जाहीर.

Navi Mumbai Mahanagarpalika Employees Diwali Bonus नवी मुंबईतील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी आनंदाची ठरणार आहे. कारण सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट ५ हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ४५ हजार रुपयांचा बोनसही जाहीर करण्यात आला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना ४५ हजार रुपयांच्या बोनसचे चेक देण्यात आले. पगारवाढ आणि भरघोस बोनस मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कंत्राटी कर्मचारी पगारवाढ आणि बोनसच्या प्रतीक्षेत होते. आता पगारात वाढ आणि दिवाळी बोनस मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या सणात घरखर्च, खरेदी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी या बोनसचा कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा अधिक आनंदात साजरी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.