Saam Impact: 'Saam TV' च्या बातमीचा दणका ! नवी मुंबईतील ड्रायफ्रूट कंपनीवर मोठी कारवाई|VIDEO

Ambika Dry Fruit LLP Sealed: साम टीव्हीच्या रिपोर्टनंतर नवी मुंबईतील अंबिका ड्रायफ्रूट एलएलपी आणि दीपक ट्रेडिंग कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.

नवी मुंबई: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ड्रायफूट्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असताना, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ड्रायफूट्समध्ये भेसळ आणि रासायनिक पदार्थ घालून चमकदार बनवण्याचा प्रकार सुरू असल्याचे समोर आले. ही माहिती साम टीव्हीच्या बातमीमुळे प्रशासनाच्या निदर्शनास आली.

याबाबत अन्न व औषध प्रशासनाने ताबडतोब कारवाई करत मे. अंबिका ड्रायफ्रूट एलएलपी या दुकानाची कसून चौकशी केली असता. तपासणीनंतर ही कंपनी सील करण्यात आली असून, व्यवसाय थांबविण्याचे आदेश दिले आहेत. अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थाची प्रक्रिया केली जात असल्याचे प्रशासनाच्या अहवालात नमूद झाले आहे. तसेच, प्रशासनाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन अनेक ठिकाणी तपासणी केली आणि अनेक ठिकाणी कारवाई केली. नवी मुंबईत दीपक ट्रेडिंग कंपनी’ या आस्थापनेवरही धाड टाकून २५,५०० रुपयांचा ‘साल्टेड रोस्टेड पिस्ता’ जप्त करण्यात आला. या कारवाईदरम्यान, अन्न व्यवसायधारक श्री. साहिल सकदा सरैया यांच्याकडून हा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. साम टीव्हीच्या बातमीमुळे प्रशासनाला जाग आली असून, अन्न व औषध प्रशासनाची ही कारवाई नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी महत्त्वाची ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com