भारत बंदची हाक; उद्या काय सुरू आणि काय बंद राहणार? VIDEO

Bharat Bandh February 12 Full Details: १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. बँका, शाळा, वाहतूक सेवा आणि सरकारी कार्यालयांवर या संपाचा काय परिणाम होणार?

देशातील अनेक संघटनांनी 12 फेब्रुवारी रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. बँक कर्मचारी संघटनांपासून ते शेतकरी संघटनांपर्यंत गुरुवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. नवीन कामगार कायदे, भारत-अमेरिका व्यापारी करार, मनरेगाचा बदल, BV-GRG सारख्या मुद्यांवर देशातील कर्मचारी संघटना आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे. या बंदमुळे बँका, सरकारी कार्यालये, सार्वजनिक वाहतूक क्षेत्र आणि बाजारपेठेवर ही याचा परिणाम दिसू शकतो. या देशव्यापी संपामुळे काही राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालय बंद राहू शकतात. या नवीन कामगार कायद्यांमुळे कर्मचारी, कामगारांचे अधिकार हिरावल्या जात असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. या कायद्यांमुळे नोकरीची सुरक्षा राहणार नाही. असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com