Nashik News : महाशिवरात्रीला नाशिक येथील त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी २ दिवस खुलं राहणार आहे. महाशिवरात्रीला बुधवारी पहाटे ४ वाजल्यापासून ते गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार आहे.
त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना पूर्व दरवाजातील दर्शन बारीतून प्रवेश देण्यात येणार आहे. या काळात व्हीआयपी दर्शन आणि गर्भगृह दर्शन देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर २६ तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी देणगी दर्शन ( पेड दर्शन ) देखील बंद राहणार आहे. महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.