Nashik News Today: नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड! भुजबळ फार्मवर नेमकं काय घडतंय?

Nashik Lok Sabha Election 2024 News Today: भाजपचे पदाधिकारी मंत्री छगन भुजबळांच्या भेटीला आलेत.

Nashik Lok Sabha Election 2024: नाशिकच्या जागेचा तिढा कायम असताना भुजबळ फार्मवर हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. भाजपचे पदाधिकारी मंत्री छगन भुजबळांच्या भेटीला आलेत. माजी आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष प्रशांत जाधव आणि विजय साने भुजबळांच्या भेटीला गेल्यानं तर्क वितर्कांना उधाण आलंय. दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉ. भारती पवारही भुजबळ यांच्या भेटीसाठी दाखल झाल्या आहेत. भुजबळ महायुतीच्या प्रचारात अंतर राखून असल्यानं या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. दिंडोरीसह नाशिक लोकसभा मतदार संघात भुजबळांची मोठी ताकद मानली जाते. भुजबळांनी जरी स्वतः लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली, तरी नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात चढाओढ पाहायला मिळत असल्याचं बोललं जातंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com