Dwarka Chowk: वाहतूक बेट काढल्यानंतरही द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कायम|VIDEO

Nashik News:नाशिकच्या द्वारका येथील वाहतूक कोंडी ही नेहमीचीच डोकेदुखी ठरत आहे, आज देखील याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

नाशिक शहरातील प्रमुख चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका चौकात रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. चौकातील वाहतुकीचा ताण इतका वाढला की चारी बाजूंनी रस्ते फुल झाले असून, एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या.

रविवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस आणि दुसरीकडे उड्डाण पुलाच्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी अधिकच तीव्र झाली. याच चौकातून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि आग्रा या प्रमुख मार्गांना जोडणारे महामार्ग जात असल्याने या ठिकाणी वाहनांची गर्दी नेहमीच असते. मात्र आजची कोंडी नेहमीपेक्षा जास्त होती.

या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी वाहनांमध्ये तासन्‌तास काढले असून, शाळा, रुग्णालये व कार्यालयीन कामांवर जाणाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक पोलीस घटनास्थळी असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com