Nandurbar News: गरोदर महिलेचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास, धक्कादायक VIDEO

Pregnant Woman Travel 7 km from flood water In Nandurbar: नंदुरबारमध्ये गर्भवती महिलेनं पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास केल्याचं समोर आलंय. या प्रकारामुळे जिल्ह्यातील प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

मुंबई: नंदुरबारमधून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आलीय. जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था चांगली नसल्याचा आरोप वेळोवेळी केला गेलाय, परंतु आता या संदर्भात एक व्हिडिओच समोर आलेला आहे. एका प्रसुती झालेल्या महिलेला चक्का पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागल्याची घटना समोर आली आहे. रूग्णालयात प्रसुती झाल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी पूलच नव्हता. त्यामुळे या महिलेला झोळी करून पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागला आहे. गमलीबाई किसान पावरा, असं या महिलेचं नाव आहे. मागच्या आठवड्यात प्रसुती कळा आल्यानंतर तिला अशाच पद्धतीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सुमारे सात किलोमीटर अंतराचा जीवघेणा प्रवास या गरोदर महिलेनं केलाय. त्यामुळे नंदुरबारमध्ये मुसळधार पावसात गर्भवती महिलेनं नदी पार केलीय. त्यामुळे आता प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नागरिकांमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे. नंदुरबारमधील आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव केव्हा बदलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com