Nagpur News: ड्रोनचा वॅाच, हजारोंचा पोलीस बंदोबस्त, रामनवमीसाठी नागपुर पोलिस सज्ज, VIDEO

Ram Navami: रामनवमीनिमित्त कुठलाही ताणतणाव निर्माण होऊ नये यासाठी नागपूर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे.

औरंगजेबाच्या कबरीवरून 17 मार्च रोजी नागपूरमध्ये दोन गटात मोठा राडा झाला होता. एका आंदोलनाच्या ठिणगीने नागपूरमध्ये मोठी दंगल उसळली होती. या दंगलीत मोठ्या प्रमाणात गाड्यांची तोडफोड करून वाहने जाळण्यात आली होती. तसेच अनेक पोलीस कॉन्स्टेबल आणि उपयुक्त दर्जाच्या पोलिसांवर देखील प्राणघातक हल्ला झाला होता. या दंगलीमुळे नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. याच अनुषंगाने रामनवमीच्या निमित्ताने अशी घटना घडू नये म्हणून नागपूर पोलीस सज्ज झाली आहे. याबाबत नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी माहिती दिली आहे.

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी होणार आहे. त्यासाठी आमची तयारी झाली आहे. तसेच मिरवणुकीचा जो मार्ग आहे त्याचा आम्ही बारकाईने तपास केला असून संपूर्ण मिरवणुकीमार्गावर ड्रोनची नजर असणार आहे. तसेच हजारोंच्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त राहणार आसल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com