Nagpur Voter List Controversy: नागपुरात एकाच घरात 200 मतदार; निवडणूक आयोगावर पुन्हा प्रश्नचिन्ह|VIDEO

200 Voters Registered At One House In Nagpur: नागपूरच्या हिंगणा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये घर क्रमांक एकासमोर 200 लोकांची नावे दिसून मोठा घोळ उघड झाला आहे.

नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात याद्यांमध्ये घोळ असल्याचा समोर आलेले आहे. या याद्यांमध्ये घर क्रमांक एक असा उल्लेख करत 200 लोकांच्या नावासमोर अशाच पद्धतीचा उल्लेख पाहायला मिळतो आहे. विशेष म्हणजे संपत बावनथडे यांच्या घरी लहान मुलांना धरून आठ सदस्य राहत असताना त्यांच्या घर क्रमांक एकचा उल्लेख 200 पेक्षा जास्त लोकांच्या नावासमोर आपल्याला पाहायला मिळतो आहे.

हा घोळ संपूर्ण हिंगणा विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे. दरवर्षी सात ते आठ हजार नाव वाढण्यापेक्षा जवळपास 50-50 हजार मतदार वाढत असल्याचा आरोपही दिनेश बँक यांनी साम टीव्ही शी बोलताना केलाय.

यातही विशेष म्हणजे आजूबाजूला राहणारे लोकांचं त्या यादीत समावेश नसून यादीत असलेले व्यक्तींचे नाव अनोळखी असल्याचाही दावा स्थानिक नागरिकांकडून केला जातोय. त्यामुळे हे व्यक्ती या भागात राहतच नसताना नेमके आले कुठून याचा शोध घेण्याची गरज आहे. मतदार यादी तयार होत असताना आधार कार्डशी लिंक का केला जात नाही असा प्रश्नही शरद पवार गटाचे नेते दिनेश बंग यांनी उपस्थित केलाय. यासह स्थानिक लोकांचे नाव मात्र मतदार यादी मध्ये नसल्याचाही आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com