Nagpur Deekshabhumi News: दीक्षाभूमीतील पार्किंगला विरोध, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया...!

नागपूरमध्ये दीक्षाभूमीच्या विकासकामांमध्ये अंडरग्राऊंड पार्किंगचं काम सुरू आहे. या कामाला बौद्ध अनुयायांनी विरोध केलाय.

Nagpur Deekshabhumi News: नागपूरमध्ये दीक्षाभूमीच्या विकासकामांमध्ये स्तुपाच्या परिसरातील जागेवर अंडरग्राऊंड पार्किंगचं काम सुरु आहे. बौद्ध अनुयायांचा या पार्किंगच्या कामाला विरोध आहे. 14 एप्रिल, 6 डिसेंबर, तसेच महत्त्वाच्या दिवशी इथे आलेले लाखो अनुयायी या जागेत मुक्काम करतात. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था इतर ठिकाणी करण्याची अनुयायांची मागणी आहे. ग्राऊंडवर आताही पार्किंग होतं, तर अंडरग्राऊंड पार्किंगची गरज काय, असा आंदोलनकर्त्यांचा प्रश्न आहे. दरम्यान यालर आता प्रकाश आंबेडकरांनी आपली प्रतिक्रिया दिलीये. दीक्षाभूमी, नागपूरमध्ये कुठलीही पार्किंगची मागणी नसताना ट्रस्टींनी त्याचा घाट घातला. याविरोधात जनता उतरलीये. ट्रस्टींनी लोकांच्या भावनेशी खेळू नये. आमचाही या पार्किंगला विरोध आहे. आंदोलनकारी जनतेच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी उभी आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com