MVA News : ठाकरे गट – कॉंग्रेस वाद मिटला? मविआची आज महत्वाची पत्रकार परिषद

MVA Press Conference News : मविआच्या जागावाटपावर आज सुपारी पत्रकार परिषद बोलावण्यात आली आहे. यात उमेदवारांची यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत मविआचं जागावाटप जाहीर केलं जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभेच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसमध्ये जागावाटपावरून वाद निर्माण झाला होता, त्यानंतर मविआमध्ये फुट पडेल असं वाटत असतानाच आता आज दुपारी जागावाटप जाहीर करण्यासाठी महाविकास आघाडीकडून पत्रकार परिषद बोलावण्यात आली आहे. काल राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून वाद मिटवत मविआमध्येच राहण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता कॉंग्रेससोबतचा ठाकरेंचा वाद मिटल्याचं दिसत आहे. या पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची यादी देखील जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com